पर्यावरण शिक्षण व जलसूरक्षा प्रकल्प -
पर्यावरण प्रकल्प कसा लिहावा
|
अनुक्रमणिका |
अ.क्र. |
घटकाचा
तपशील |
१ |
प्रकल्प विषय निवड (प्रस्तावना) |
२ |
विषयाचे महत्व |
३ |
प्रकल्प कार्य उद्दिष्टे |
४ |
प्रकल्प कार्यपद्धती |
५ |
निरीक्षणे |
६ |
माहितीचे विश्लेषण |
७ |
निष्कर्ष |
८ |
प्रकल्पाचे सादरीकरण |
९ |
प्रकल्प अहवाल लेखन |
१० |
जर्नल कार्य / सेमिनार कार्य |
११ |
प्रमाणपत्र |
प्रकल्प विषय निवड (प्रस्तावना) -
प्रकल्प कार्यासाठी स्थानिक पातळीवर विद्यार्थ्याने मार्गदर्शकाच्या मदतीने पर्यावरणासंदर्भातील एखादा विषयाची निवड करणे गरजेचे आहे. अर्थात पर्यावरण विषयाची स्वरूप व व्याप्ती फार मोठी आहे. आपल्या परिसरात पर्यावरणाचाबत अनेक घटना, समस्या उदाहरणच द्यायचं झालं तर नाशिक शहरामधून वाहणाच्या गोदावरी नदीचे प्रदूषण हा विषय घेता येईल किंवा भरमसाठ वाहनांच्या संख्येमुळे भाषण ध्वनी प्रदूषण, वाहतुकीची समस्या इ. विषयांवरही प्रकल्प करता येईल. असे असंख्य विषय तुम्हाला आजूबाजूच्या परिसरात सापडतील ज्या शहरा गावात तुम्ही राहता तेथील विविध वनस्पती, पशु-पक्षी, कीटक यांचे सव्हें करता येईल. जैवविविधतेवर आधारीत हे प्रकल्प असतील. शहरातील घनकचरा व हॉस्पिटल्समधील घन कचऱ्याची विल्हेवाट कशी लावली जाते यावरही प्रकल्प करता येईल. परिसरातील शेती उत्पादिक केला जाणारा भाजीपाला, किडीच्या बंदोबस्तासाठी वापरली जाणारी विविध कीटकनाशके यावरही प्रकल्पाची निवड करता येईल. थोडक्यात अनेक विषय आहेत त्यावर प्रकल्प कसा चागल्या रितीने करता येईल याची खूणगाठ विद्यार्थ्यांनी मनाशी बांधली पाहिजे, प्रकल्प खूप भव्यदिव्य नकोत. छोटे-छोटे प्रकल्प प्रभावी ठरतात. विषयाची निवड करण्यासाठी गुणदान पद्धतीत २ गुण आहेत. म्हणून योग्य विषयाची निवड करणे गरजेचे आहे.
विषयाचे महत्व -
प्रकल्प निश्चिती करतांना प्रासंगिकतेला फार महत्त्व आहे. आपल्या दैनंदिन जीवनात किंवा मानवाच्या भवितव्यासाठी कल्याणास विकासासाठी प्रकल्पांचे महत्त्व असायला हवे. टाकावू, कालबाह्य, निरूपयोगी प्रकल्प घेण्यात अर्थ नाही. मानव सजीव अभार्यावरणार त्याची उपयुक्तता असायला हवी. त्यातून काही ज्ञान, अनुभव मिळाले पाहिजे. काही चांगले निष्कर्ष निघाले पाहिलेत. काही उपयोजना, समस्या दुष्परिणामांचा अभ्यास करता आला पाहिजे. त्या निमित्ताने काही सुधारणा करता आल्या पाहिजेत, त्या प्रकल्पाच्या अनुषंगाने संशोधकवृत्ती व लागली पाहिजे. परिसर, समाज तथा पर्यावरणाच्या संवर्धन व संरक्षणासाठी त्या प्रकल्पाची उपयोगिता असायला हवी. त्याचप्रमाणे काही उस कौशल्ये, वैज्ञानिक दृष्टी विट्याच्यांच्या अंगी येणं गरजेचे असते. म्हणून प्रकल्प निवडतांना त्याची प्रासंगिकता महत्त्वाची तरते. यासाठी २ गुण आहेत.
उद्दिष्ट्ये -
प्रकल्प निवड झाल्यानंतर पुढील महत्त्वाचा टप्पा म्हणजे त्या प्रकल्पाची उद्दिष्ट्ये महत्त्वाची ठरतात. ती उदिष्टचे स्पष्ट करावीत. उदाहरणार्थ जलप्रदुषणाच्या प्रकल्पाबाबत आपल्याला काही उद्दिष्ट्ये स्पष्ट करता येतील. जलप्रदुषणाची कारणे शोधणे व त्यांचा अभ्यास करणे. जलप्रदुषणामुळे निर्माण होणाऱ्या विविध समस्यांचा अभ्यास करणे, जलप्रदूषण मापन करणाऱ्या प्रयोगांची माहिती मिळविणे. उदा. पाण्यातील कमी होणारा ऑक्सिजन, पाण्यात वाढलेल्या जीवाणूंचा अभ्यास करणे, या समस्येमुळे उद्भवणारे विविध आजार, जलप्रदुषण समस्येबावत जनजागृती करणे, जलप्रदुषण कमी करण्यासाठी उपाययोजना सुचविणे इ. उद्दिष्ट्ये विद्याथ्यीना लिहिता येतील. अशा प्रकारे प्रत्येक प्रकल्पाची काही ना काही उद्दिष्टये असतात. त्यांचाही अभ्यास करणे गरजेचे आहे, आणि प्रकल्प लिहितांना ते विशद करणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी २ गुण ठेवलेले आहेत.
वापरलेली अभ्यास पद्धती (Proposed Methodology)-
प्रकल्प निवडीमागे सामान्यपणे शास्त्रीय दृष्टी असावी, परंतु प्रकल्प हा संशोधन पद्धतीच्या पाय-यांप्रमाणे सादर करावा अशी अपेक्षा नाही संशोधन व प्रकल्पामध्ये मूलभूत फरक आहे. संशोधनामध्ये एखाद्या विषयाच्या अनुषंगाने संशोधन करावे लागते. त्यात प्रस्तावना, संबंधित साहित्याचा आढावा घ्यावा लागतो. कोणती पद्धती व साहित्य वापरले त्याची माहिती दयावी लागते. प्रयोग करावे लागतात. त्यातून काही निरीक्षणे व अनुमान काढावे लागतात. त्यानंतर चर्चा करावी लागते. संदर्भ सूची दयावी लागते. या विभागासाठी ४ गुण आहेत.
प्रकल्पासाठी काही ढोबळ पद्धतींचा वापर करावा लागतो. त्या खालीलप्रमाणे असतात.
१) प्रश्नावली व सर्वेक्षण पद्धती प्रकल्पासाठी प्राथमिक माहिती, आकडेवारी गोळा करण्यासाठी प्रश्नावली पद्धत महत्त्वाची असतेः प्रत्यक्ष भेटीद्वारे, चर्चेतून अथवा प्रश्नावलीचा उपयोग माहितीचे संकलन करण्यासाठी केला जातो. यामध्ये लोकांना विचारण्यासाठी प्रश्नांची यादी केली जाते. प्रश्नावलीसाठी प्रश्न काढण्यापूर्वी प्रकल्पाची मध्यवर्ती संकल्पना लक्षात घेणे, म्हणजेच कशा प्रकारची माहिती आपल्याला प्रश्नांद्वारे हवी आहे याची कल्पना असणे आवश्यक आहे. ध्वनीप्रदुषण प्रकल्प हा जलप्रदूषण प्रकल्पापेक्षा वेगळा असल्याने दोन्हीसाठी प्रश्नावली भिन्न असेल. प्रश्नावलीमुळे वेळ वाचतो, नेमकेपणा येतो, पुनरावृत्ती टळते, लेखी माहिती मिळते. तसेच माहितीचा उपयोग संदर्भम्हणून वापर होतो.
२) प्रायोगिक पद्धती :- हथा पद्धतीचा प्रामुख्याने वापर संशोधनासाठी होतो, परंतु प्रकल्पांमध्ये देखील काही छोटे छोटे प्रयोग करता येतात. त्यामुळे प्रकल्पाला अधिक बळकटी येते. उदा. ध्वनीप्रदुषणाचा अभ्यास करण्यासाठी आवाजाची तीव्रता मोजण्यासाठी साऊंड लेव्हल मीटरचा वापर करावा लागतो. त्यावरून वेगवेगळ्या ठिकाणचे वाहनांचे आवाज मोजता येतात. पाण्याच्या प्रदुषणाचा अभ्यास करतांना विविध ठिकाणचे पाण्याचे नमुना घेऊन ते तपासता येतात. त्यावर उपाययोजना सुचविता येते.
३) क्षेत्रभेट (Field Visit):-काही प्रकल्पासाठी प्रत्यक्ष स्थळाला भेट देऊन तेथील माहिती संकलित करावी लागते. उदा. एखाद्या जंगलाला भेट दिल्यानंतर तेथील परिसराचा क्षेत्रभेटीने अभ्यास करता येतो. त्यामुळे या पद्धतीला खूप महत्त्व आहे. तेथे घेतलेले फोटोग्राफही उपयुक्त ठरतात.
४) ऐतिहासिक पद्धती :- या पद्धतीत एखादी वस्तू वा वास्तू याविषयी विविध पद्धतीने माहितीचे संकलन केले जाते. प्रत्यक्ष त्या स्थाळाला भेट दिली जाते.
५) वस्तू-संग्राहक पद्धत :- विविध बाबींची माहिती मिळविण्यासाठी प्रसंगी वस्तू जमा कराव्या लागतात. उदा. जुन्या काळात वापरात येणारी नाणी, त्यांची किंमत, त्यामधील धातूचे प्रमाण, कालावधी इ. गोष्टींचा अभ्यास या वस्तूंवरून करता येतो.
६) प्रतिकृती, चित्रे, नकाशे:- ही साधने तयार करून देखील प्रकल्प तयार करता येतो.
पर्यावरणाचा प्रकल्प हा साधारणतः विद्यार्थ्यांच्या स्थानिक परिस्थितीला अनुसरून असला पाहिजे. (परंतु यापुरतेच मर्यादित नाही) सर्वसाधारणपणे विद्यार्थ्यांना त्यांच्या स्थानिक पातळीवरील पर्यावरणाच्या समस्यांचा विचार करण्यास प्रवृत्त करावे, जेणेकरून त्यांना सभोवतालच्या समस्यांचा विचार करण्याची, त्यावरील उपाय योजण्याची व पर्याय शोधण्याची संधी प्राप्त होऊ शकते.
निरीक्षण -
प्रकल्पामध्ये निरिक्षणालाही खूप महत्त्व आहे. निरीक्षण हे नियोजनबध आणि सुव्यवस्थितपणे करणे गरजेचे असते. निरीक्षण माणने प्रत्यक्ष पर्यावरणात जाऊन पाहणे, नोंदी ठेवणे, त्यामुळे प्रकल्प लेखनात अडचणी येत नाहीत. कोणताही पूर्वग्रह दुचित विचार मनात न ठेवता निरीक्षण करणे गरजेचे असते. पुढील टप्पे तथा निष्कर्षाप्रत जाण्यासाठी निरीक्षण उपयुक्त ठरते. निरीक्षणावर अभ्यासकाचे पूर्ण नियंत्रण असते. त्यासाठी नोंदवही ठेवावी लागते. बारीक सारीक तपशिल तथा निरीक्षणे चहीत नोंदवून ठेवावीत. अहवाल लेखनात या बाबी उपयुक्त ठरतात. यासाठी प्रकल्पास ४ गुण ठेवलेले आहेत
विश्लेषणे (Analysis)-
अंकीय किंवा सांख्यिकीय आधारे आपण संकलित केलेल्या निरीक्षणांच्या आधारे विश्लेषण करणे हा महत्त्वाचा टप्पा आहे. मध्य, मध्यमान, सहसंबंध, सरासरी, टक्केवारी इत्यादीच्या आधारे विश्लेषण अधिक अचूक व प्रभावी होते. सदर पद्धतीने आपण आलेख, स्तंभालेख अगा आकृतीच्या माध्यमातून माहिती आपण प्रभावीपणे दर्शवू शकतो. या भागासाठी ४ गुण आहेत.
परिणाम-
पर्यावरणाचा अभ्यास करताना लक्षात येते की, स्थानिक पातळीवर झालेला हा बदल चांगला की वाईट या बाबत प्रयोग, निरीक्षण, विश्लेषण यावरून निष्कर्ष काढता येतो. जर बदल विघातक असतील तर प्रतिबंधक उपाय सुचविता येतात. जर बदल चांगले व पर्यावरणाशी सुसंगत असतील तर त्यात अधिक सुधारणा करता येतात, त्यांची जपवणूक करता येते. म्हणून पर्यावरणाचा अभ्यास हा वैज्ञानिक पद्धतीने वर उल्लेखिलेल्या टप्प्याटप्याने करावा लागतो. वैज्ञानिक पद्धतीत प्रकल्प करताना केलेल्या कामाचे काही निष्कर्ष काढता येतात. त्यावरून काही फलनिष्पत्लीही मिळते आणि त्याचप्रमाणे त्यातून फलितही हाती लागते. माणून अत्यंत चिकित्सकपणे प्रकल्प तयार करावा लागतो. यासाठी २ गुण आहेत.
प्रकल्पाचे सादरीकरण (Project Presentation)-
प्रकल्प तथा क्षेत्र कार्यासाठी निवडलेल्या स्थळाला भेट दिल्यानंतर संकलित केलेल्या माहितीच्या आधारे विद्यार्थ्याने प्रकल्प अहवालाचे लेखन करायचे असते. विट्धाच्यर्थ्यांनी स्वतंत्रपणे किंवा गटाने क्षेत्रभेटीद्वारे निरीक्षणातून किंया लोकांना प्रश्न विचारून माहिती गोळा करावी. प्रश्नावलीची रूपरेषा मार्गदर्शक शिक्षकाकडून तपासून घ्याची क्षेत्रभेटीच्या वेळी विद्यार्थ्यांनी बारकाईने निरीक्षण करून आवश्यक त्या घटकांची नोंद करावी. अशां प्रकारची माहिती ही नोंदीच्या स्वरूपात तक्त्यांच्या स्वरूपात किंवा चित्रांच्या स्वरूपातही संकलित करता येते. आपल्याला हवी असलेली माहिती प्रश्नावलीच्या साहाय्याने मिळविता येते किंवा विविध लोकांशी बालून, चौकशी करून, चर्चा करून माहिती मिळविता येते. प्रश्न विचारतांना त्यांच्या बेळेचा अपव्यय होईल असे निरर्थक प्रश्न विचारू नका, तसेच त्याचा अपमान होईल. त्यांना संकोच वाटेल असे प्रश्न टाळा. विद्यार्थ्यांनी गोळा केलेल्या माहितीचे वर्गीकरण करून तक्त्यात भरून, शक्य झाल्यास वारंवारिता वितरण तंत्राचा वापर करून नंतर त्याचे विश्लेषण करून व आपले गृहितक लक्षात घेऊन निष्कर्ष काढणे आवश्यक असते.
१.अहवाल लिहितांना प्रकल्पाचे शीर्षक लिहावे.
२. भेटीचे ठिकाण का निवडले? क्षेत्रभेटीचा उद्देश व हेतू कथन करावा.
३. छोट्याशा प्रस्तावनेट्वारे तुमच्या अहवालाचे उदिष्ट स्पष्ट करा.
४. निवडलेल्या क्षेत्राचे स्थान, सभोवतालच्या परिस्थितीचे वर्णन करा. त्या ठिकाणचा आराखडा, नकाशा, फोटो इत्यादी पूरक माहितीचा समावेश करा.
५. माहिती गोळा करण्यासाठी कोणत्या पद्धती वापरल्या त्याबद्दल लिहा. माहिती जमा करण्यासाठी वापरलेली प्रश्नावली जोडा.
६. निरीक्षण नोंदी, आवश्यक असेल तेथे आकडेवारी तक्त्याच्या स्वरूपात ट्या. नकाशे, चित्रे, आराखडे, छायाचित्रे यांचा योग्य तेथे वापर करा.
७. निवड केलेल्या परिसरातील पर्यावरणीय घटकांचे वर्णन करून महत्त्व विशद करावे, परिसंस्थेचे वर्णन करावे. मानवी हस्तक्षेप कसा होतो त्यावर ७. चर्चा करावी.
८.विद्यार्थ्यांनी आपले निष्कर्ष नोंदवावेत. एखादया समस्येवर उपाययोजना काय सुचवाल ते लिहा.
९ माहितीचे सादरीकरण करा. उपक्रमात नाचिन्य काय आहे ते विशद करा.
१०. ठळकपणे निष्कर्ष लिहा.
११. पूरक संदर्भाची सूची तयार करा.
या विभागासाठी बाह्य परीक्षक ५ गुणांपैकी गुणदान करतील.
मौखिक परीक्षा (Oral/Viva-voce)
प्रकल्पाचा सर्वात शेवटचा टप्पा म्हणजे मौखिक परीक्षा. या विभागासाठी ५ गुण ठेवलेले आहेत. त्यांचे गुणदान बाहय परीक्षक करतील. तुम्ही कोणता प्रकल्प निवडला, का निवडला ? त्यामागील हेतू काय? त्याची उपयोगिता काय ? किती वेळा भेटी दिल्या? काय निरीक्षण केलीत ? कोणते प्रयोग केलेत ? त्यांचं विश्लेषण कसे केले ? निष्कर्ष कसे काढले? याबद्दलचे छोटे छोटे प्रश्न तुम्हाला परीक्षक तथा आपले शिक्षक विचारतील. त्यामुळे तुम्हाला प्रकल्पाचे पूर्ण आकलन झालेले पाहिजे. तुम्ही जर मनापासून प्रकल्प केलेला असेल तर कोणत्याही प्रश्नाचे उत्तर तुम्हाला देता येईल. त्यामुळे गुणदान पद्धतीमधील हे विविध मुद्दे अत्यंत महत्त्वाचे आहेत. जे उत्तर येत असेल तेच दया. चुकीचे व विसंगत उत्तर देण्याचे टाळावे. म्हणून चांगले गुण मिळू शकतील. एकूणच पर्यावरणशिक्षण विषयाचा पाया अथवा अभ्यासक्रम तुम्हाला माहित असावा.
प्रकल्प कार्याचे महत्त्व
१) कोणत्याही समस्येबद्दल, घटनेबद्दल अदद्ययावत माहिती मिळविण्याचे प्रकल्प कार्य हे साधन आहे.
२) विट्याच्यर्थ्यांनी स्वतः निरीक्षण, परीक्षण, प्रयोग करून काही गोष्टी शोधून काढल्या तर त्यामुळे त्यांची अभ्यासातील त्या विषयातील गोडी वाढण्यास मदत होते.
३) विविध प्रकारचे साधे प्रयोग करण्याची संधी प्रकल्प कार्यामुळे मिळते.
४) पर्यावरणाच्या अभ्यासासाठी निसर्गाशी मैत्री होते. निसर्गाकडून अनेक गोष्टी शिकता येतात. निखळ आनंद मिळतो.
५) ज्ञानाचा शोध घेण्याच्या प्रक्रियेतील एक पटक म्हणून निर्मितीचा वेगळा आनंद तुम्हाला मिळतो.
६)काम करतांना उद्भवणाऱ्या अनेक अडचणींवर मात करण्याची क्षमता विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होते. विद्यार्थी पर्यायी विचार करून निर्णय घेऊ शकतात.विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वास बाढीस लागतो. विट्यार्थ्यांमधील धडाडी, साहसीवृत्ती व आव्हानांना तोंड देण्याची क्षमता, जिद्द वाढते. प्रत्यक्ष क्षेत्रीय अभ्यास करतांना निर्णयक्षमता वाढते. अनेक गोष्टी पाहणे, अनुभवणे यातून दृष्टिकोन व्यापक बनतो.वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागतो. प्रकल्प कार्यामुळे आत्मविश्वास, दुसऱ्याला उपयोगी पडण्याची प्रवृत्ती, स्पष्ट विचारसरणी यात वाढ होते. तसेच दुसऱ्याबरोबर काम करण्याची क्षमता निर्माण होते. संशोधक व चिकित्सक वृत्ती वाढीस लागते. प्रकल्प कार्यासाठी आवश्यक कौशल्ये
प्रकल्प कार्यामुळे विद्यार्थी खालील कौशल्ये आत्मसात करू शकतात
प्रकल्प कार्यामुळे अधिक कार्यक्षम व सोप्या पद्धतीने माहिती गोळा करणे, विश्लेषण करणे, सादर करणे व अन्वयार्थ लावणे याची क्षमता विकसित करणे.प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या माहितीचे स्त्रोत शोधून काढणे व योग्य प्रकारे माहिती गोळा करण्याची क्षमता विकसित करणे.योग्य माहितीची निवड करणे, अनावश्यक माहिती गाळणे व विविध स्त्रोतांद्वारे मिळालेल्या माहितीचे संकलन करणे, माहितीचा शोध घेऊन व निष्कर्षाने विश्लेषण करून नवीन माहिती / आकडेवारी सादर करण्याची क्षमता विकसित करणे.जमविलेल्या माहितीचे विश्लेषण करून अनुमान काढण्याची क्षमता विकसित करणे. प्रकल्पातील निष्कर्ष आकडेवारीच्या स्वरूपात, चित्रे, आलेख, नकाशे, अहवाल स्वरूपात सादर करण्याची क्षमता विकसित करणे.