बारावीच्या बाेर्ड परीक्षेत यशस्वी हाेण्यासाठी टिप्स

बारावीच्या बाेर्ड  परीक्षेत यशस्वी हाेण्यासाठी टिप्स  

बारावीच्या बाेर्ड परीक्षांसाठी बसणाऱ्या विद्यार्थ्यांनी यावेळी आपली तयारी पुन्हा एकदा तपासावी. आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवताना स्वत:ला मानसिक रूपाने तयार करावे...

 
बाेर्डाची परीक्षा येताच विद्यार्थ्यांमध्ये भीती निर्माण हाेणे सर्वसामान्य गाेष्ट आहे. ज्या विद्यार्थ्यांची तयारी चांगली नसेल ते रिव्हिजन करताना घाबरतात आणि ज्यांनी संपूर्ण वर्षराभरात तयारी केली नाही ते परीक्षेपर्यंत जास्तीत जास्त वाचन करण्याचा प्रयत्न करतात, ज्याचा त्यांना त्रास हाेताे. तुम्ही यापैकी काेणत्याही कॅटेगरीत येत असलात तरी हे जाणून घ्या की, ही वेळ घाबरण्याची नाही. तर परीक्षेच्या तयारीसाठी पूर्णपणे समर्पित राहण्याची आहे. यावेळी केवळ वाचनाऐवजी स्मार्ट पद्धतीने अभ्यास करणे आवश्यक आहे.
 
स्मार्ट रणनीती बनवा
 
जर तुम्ही पूर्ण वर्षभर चांगला अभ्यास केला नसेल तर काही दिवसांमध्येच सर्व अभ्यास पूर्ण करण्याचा विषय मनातून काढून टाका. ज्या विषयाचा अभ्यास करायला बसाल त्याच्या टाॅपीक्सचे वेटेज पाहा. प्रश्नपत्रिकेत ज्या टाॅपिकमधून जास्त गुणांचे प्रश्न विचारले जातात, त्यांच्यावर लक्ष केंद्रित करा. यातून प्रश्नांच्या स्वरूपाचा अंदाज येऊ शकेल. सिलॅबस वाचल्यानंतर जुनी प्रश्नपत्रिका पाहून तयारी केल्याने फायदा हाेईल.
 
राेज टाइम टेबल बनवा
 
नेहमी विद्यार्थ्यांना टाइम टेबल (वेळापत्रक) तयार करून अभ्यास करण्यासाठी सांगितले जाते. पण तुम्हाला याचा फायदा काय आहे ते माहिती आहे? टाइम टेबल तयार करून अभ्यास केल्याने आपले लक्ष इकडे तिकडे भरकटत नाही. जर टाइम टेबल न बनविता काेणी अभ्यास करायला बसले तर नेहमी लक्ष बाकीच्या विषयांकडे जाते की, अजून इतका अभ्यास करायचा शिल्लक आहे.अशा प्रकारे लक्ष विचलित हाेण्यापासून वाचविण्यासाठी अभ्यास करण्याच्या आधी हे निश्चित करा की, कुठला अभ्यास करायचा आहे.

लिहिणे चांगले आहे
 
नेहमी म्हटले जाते की, लिहून लक्षात ठेवलेला अभ्यास सुलभपणे विसरला जात नाही. पण वेळ कमी असल्यामुळे सर्व धड्यांच्या उत्तरांचा अभ्यास लिहून करण्याचा विचार करू नका. काेणत्याही धड्याची तयारी करताना त्यातील मुख्य बिंदू जरूर एका वेगळ्या कागदावर लिहित राहा. त्यामुळे परीक्षेच्या आदल्या रात्री तुम्हाला पुन्हा पुस्तक उघडून पाहण्याची गरज राहणार नाही. गणित आणि विज्ञानाच्या प्रश्नांना साेडविताना त्यांची उत्तरे किंवा साेडविण्याची पद्धती समाेर ठेवू नका.
 
सकारात्मक विचार ठेवा
 
नेहमी अभ्यास करताना मनात नकारात्मक विचार येत राहतात. तुम्हाला करायचे हे आहे की, परीक्षेची तयारी सुरू करण्याआधी स्वत:ला विश्वास द्या की, तुम्ही करू शकता आणि तुम्ही त्यासाठीच काम करत आहात.स्वत:वर विश्वासाची भावना जेव्हा तुमच्या मन आणि बुद्धीपर्यंत पाेहाेचेल तेव्हा तुम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करण्याचा प्रयत्न कराल.
 
परीक्षेमुळे त्रासून जाऊ नका
 
एक गाेष्ट आपल्या मनाला समजावून सांगा की, ही एक परीक्षाच आहे, त्यापेक्षा जास्त काही नाही. तुम्ही तेथे केवळ आपली चांगली कामगिरी करायला जात आहात.काेणतीही लढाई जिंकण्यासाठी किंवा हरण्यासाठी नाही.जर तुम्ही परीक्षा केंद्र आधी पाहिले नसेल तर तेथे जाऊन त्याचे ठिकाण पाहून या. त्यामुळे परीक्षेच्या दिवशी वेळ वाया जाणार नाही.
 

No comments:

सदिच्छा भेट- खाकुर्डी ता- मालेगाव (नाशिक)

Featured Post

Appreciation of the poem and Figure of speech - 2.2 The Sower

                                        Std- 11th English         2.2 The Sower - Victor Hugo  Appreciation of the poem and   Figure of spe...